जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनीचा पदग्रहण सोहळा संपन्न

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ डिसेंबर २०२१ । शहरातील तेजस्विनी जायंटस स्थापनेचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी जायंटस वेल्फेअर फाउंडेशनचे उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.

यावेळी महापौर जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे, जायंटस स्पेशल कमिटी मेंबरचे किशोरकुमार मिश्रा, फेडरेशन अध्यक्ष डॉ. संतोषकुमार मिश्रा, माजी अध्यक्ष पी. ई. पाटील, समाज कल्याण अधिकारी संजय चौधरी, प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील, तेजस्विनी जायंटसच्या संस्थापक अध्यक्षा मनिषा पाटील जायंटस फेडरेशनच्या उपाध्यक्षा संगीता पाटील, वसुंधरा जायंटस सहेलीच्या अध्यक्षा महानंदा पाटील आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान सूत्रसंचालन ज्योती राणे यांनी केले तर विद्या पाटील यांनी आभार मानले. प्रकाश झांबरे, राजकमल पाटील, सुमित्रा पाटील, डॉ. सारिका पाटील, ऍड. सीमा जाधव, अनिता पाटील, भावना चव्हाण, योगिनी पाटील, माधुरी अत्तरदे, विभावरी पाटील, नूतन तासखेडकर, भारती कापडणे, आरती व्यास किमया पाटील, मंगला पाटील, निशा चौधरी, रेणुका हिंगू इंदिरा जाधव, स्मिता पाटील, पुष्पा पाटील उपस्थित होत्या.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar