fbpx

सावदा येथे ताई फाउंडेशन तर्फे गरजू महिलांना गीझर वाटप

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१ । सावदा येथे नेहमी विविध समाज उपयोगी विशेषत: समाजतील गरीब व गरजू महिला साठी उपक्रम राबविणा-या “ताई फाउंडेशन” तर्फे दी 29 रोजी गरीब गरजू महिलांना गीझर वाटप करण्यात आले,
ताई फाउंडेशन तर्फे कोणताही गजावाज न करता अगदी साध्या पद्धतीने सदर कार्यक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष दिपक सपकाळे यांचे घरी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून सदर प्रसंगी समाजतील 40 गरजू महिलांना या गीझर चे वाटप फाउंडेशनचे अध्यक्ष दिपक सपकाळे यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी कोणत्याही राजकीय, सामाजिक व्यक्ति किंवा अधिकारी यांना आमंत्रित न करता छोटे खानी कार्यक्रमा घेऊन एक वेगळा पायंडा पाडला व समाज समोर वेगळे उदाहरण उभे केले, दरम्यान या मोफत गीझर वाटप साठी सावदा व परिसरातील गरजू व गरीब महिलांची नाव नोंदणी सुरु आहे,
तसेच पुढील येत्या काही दिवसात सावदा परिसरातील गरजू महिलांना घर बसल्या 300 ते 600 रुपये रोज कमावता येईल असे शिलाई काम देण्यात येणार असून यातून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही ताई फाउंडेशनचे अध्यक्ष दिपक सपकाळे यांनी सांगितले, आतापर्यंत संस्थेचे माध्यमातून गत पाच वर्षात 120 महिलांना सिंगल शटल शिलाई मशीन, तसेच 40 महिलांना व्यवसाया साठी चक्की देखील उपलब्ध करून दिल्या असल्याची माहितीही दिपक सपकाळे यांनी दिली

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt