सर्वसामान्यांना महागाईचा झटका : सलग दुसऱ्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमती वाढ

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी सर्वसामान्यांना महागाईचा झटका दिला आहे. देशात व्यावसायिक सिलिंडरच्या (एलपीजी किंमत) किंमतीत 100 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यामुळे रेस्टॉरंटचे खाद्यपदार्थ पुन्हा महाग होण्याची शक्यता आहे. तर घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केला नाही.

आजच्या दरवाढीनंतर मुंबईत १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरचा भाव २०५१ रुपये इतका वाढला आहे. दिल्लीत १९ किलोचा सिलिंडर आजपासून २१०१ रुपये झाला आहे. तर चेन्नईत २२३४ असा विक्रमी दर १९ किलो सिलिंडरसाठी झाला आहे. कोलकात्यात १९ किलो सिलींडरसाठी २१७७ रुपये दर असेल.  गेल्याच महिन्यात वाणिज्य वापराच्या सिलिंडरच्या किमतीत तब्बल २६६ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

तथापि, घरगुती वापरासाठी 14.2 किलो एलपीजीच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. जळगावमध्ये घरगुती 14.2 किलो एलपीजीची किमती ९०५ रुपये आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीमुळे रेस्टॉरंट मालकांवर बोजा वाढतो आणि ते ग्राहकांना देतात. म्हणजेच रेस्टॉरंटचे खाणे-पिणे महाग होऊ शकते.

घरगुती एलपीजी आणि व्यावसायिक दोन्ही सिलिंडरच्या किमती खूप जास्त आहेत. आता एलपीजी सिलिंडरची किंमतही कमी व्हावी, यासाठी मोदी सरकारने प्रयत्न करायला हवेत.दरम्यान, यूपी, पंजाबसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुका लक्षात घेता सरकार काहीसा दिलासा देईल, अशी लोकांना अपेक्षा होती, मात्र कंपन्यांनी उलट किंमत वाढवली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -