fbpx

गॅस सिलिंडरच्या किंमती जाहीर ; जाणून घ्या नव्या किंमती

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ ऑगस्ट २०२१ ।  इंधन दरवाढीने जनता होरपळून जात आहे. पेट्रोल-डिझेल, गॅस, सीएनजी या सर्वच प्रकारच्या इंधन दरात मागील महिन्यात वाढ झाली होती. नव्या महिन्यात यापैकी व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत कंपन्यांनी वाढ केली आहे. आजच्या दरवाढीने छोट्या व्यावसायिकांना कंपन्यांनी दणका दिला. आज रविवारी वाणिज्य वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल ७३.५० रुपयांची वाढ केली आहे.तर घरगुती वापरातील गॅस सिलिंडरचा दर जुलै प्रमाणे कायम ठेवला आहे. त्यामुळे सामन्य ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे.

इंडियन ऑइलनुसार आज १ ऑगस्टपासून देशभरात वाणिज्य वापराचा १९ किलोचा गॅस सिलिंडर ७३.५० रुपयांनी महागला आहे. या दरवाढीनंतर मुंबईत १९ किलोचा गॅस सिलिंडर १५७९.५० रुपये झाला आहे. दिल्लीत तो १६२३.५० रुपये झाला आहे. चेन्नईत त्याची किंमत १७६१ रुपये आहे. तर कोलकात्यात १९ किलोचा गॅस सिलिंडर १६२३ रुपये आहे.

दरम्यान, कंपन्यांनी घरगुती वापराच्या सिलिंडर दरात कोणताही बदल केलेला नाही. मुंबईत आणि दिल्लीत घरगुती वापराच्या सिलिंडरचा दर ८३४.५० रुपये आहे. याआधी पेट्रोलियम कंपन्यानी १ जुलै रोजी घरगुती वापराच्या १४.२ किलो ग्रॅमच्या गॅस सिलींडरच्या किमतीत २५.५० रुपयांची वाढ केली होती. त्याशिवाय व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत देखील कंपन्यांनी मोठी वाढ केली होती. १९ किलोचा गॅस सिलिंडर ८४ रुपयांनी महागला होता.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज