पाटणा वनक्षेत्रात गारगोटीतस्कराला वन्यजीव विभागाने केली रंगेहाथ अटक

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । पाटणा वनक्षेत्रात अवैध उत्खनन करून मौल्यवान खडक (गारगोटी) चोरी करणाऱ्या तस्कराला, चाळीसगाव येथील वन्यजीव विभागाच्या पथकाने रंगेहाथ पथकाने पकडले. तर त्याचे दोन साथीदार पसार झाले. तोहीद युसूफखान (वय २०, रा.बामणी गराडा, ता. कन्नड, जि.औरंगाबाद) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून हजारो रूपये किंमतीचा १३ किलो मौल्यवान गारगोटी खडक जप्त केला आहे.

संशयितास न्यायालयाने ३ दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. गतवर्षीही वन्यजीव विभागाने गौताळा अभयारण्य परिसरात कारवाई करून लाखो रूपयांचा मौल्यवान गारगोटी खडक जप्त केला होता. गुप्त माहितीवरून रविवारी (दि.९) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास चाळीसगाव आणि कन्नड वन्यजीव विभागाच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी तीन संशयित उत्खनन करताना आढळले. पथकाने संशयित तोहीद खानला पकडून, त्याच्याकडून १२ किलो ९०० ग्रॅम गारगोटी खडक जप्त केला. सहायक वनसंरक्षक आशा चव्हाण, मानद वन्यजीवरक्षक राजेश ठोंबरे, चाळीसगाव वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई, पाटणा वनपाल ललित गवळी, बोढरे वनपाल दीपक जाधव, उमेश सोनवणे, अजय महिरे, उमेश शिंदे, बापू आगोणे यांनी ही कारवाई केली.

वर्षभरात तिसरी कारवाई

गेल्यावर्षी जून महिन्यात वनविभागाच्या पथकाने अभयारण्यात कारवाई करत ब्राम्हणी गराडा येथील संशयिताकडून, गारगाेटीचे ६८ किलो वजनाचे १३ बॉक्स जप्त केले होते. त्यापुर्वी १७ एप्रिलला पाटणा वनक्षेत्रात कक्ष क्रमांक ३०३ मध्ये १ लाख रूपये किंमतीचा ११ किलो मौल्यवान गारगोटी खडक जप्त केला होता. याप्रकरणी शिवना (ता. सिल्लोड) येथील तिघांना अटक केली होती.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -