जामनेरात हाणामारीत गॅरेज चालक ठार, बापलेकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । जामनेर शहरात दोन गॅरेज व्यावसायिकांमध्ये हाणामारी झाली. त्यात  एका गॅरेजचालकाचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी बापलेकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख रफीक शेख महेमुद ( वय ५०, ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. संशयित आरोपी अजय रवींद्र भगरवाल, राजेंद्र भगरवाल यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पाचोरा रस्त्यावरील गणेशवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर रफीक शेख व अजय राजेंद्र व राजेंद्र भगरवाल यांचे शेजारी-शेजारी दुचाकी दुरूस्तीचे गॅरेज आहे. दुकानावर व्यवसाय अधिक होतो या आकसापोटी दोघांमध्ये वैमनस्य वाढले, त्यात तुतू-मैमै होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले, हाणामारीत दगडाचा वापर झाल्याने रफीक यांना गंभीर इजा झाली. तोंडावर जबर मार लागल्याने दात तुटून रक्तस्त्राव झाला होता, दवाखान्यात नेतांना शेख रफीक यांचा मृत्यू झाला. संशयित आरोपी अजय रवींद्र भगरवाल, राजेंद्र भगरवाल यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज