fbpx

धक्कादायक : गणपती नगरात माथेफिरूने लावली चारचाकीला आग

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । शहरातील गणपती नगरात एका माथेफिरूने लावलेल्या आगीत चारचाकी जळून खाक झाली आहे. बुधवारी पहाटे ३.३० च्या सुमारास हा प्रकार घडला.

गणपती नगरातील जीएसटी कार्यालयाजवळ सीए एस. एस. लोढा हे राहतात. मंगळवारी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे घराजवळ कार पार्क केली होती. बुधवारी पहाटे ३ च्या सुमारास अज्ञात माथेफिरूने चारचाकीला आग लावत तिथून पळ काढला. चारचाकीला आग लागल्याचे लक्षात येईपर्यंत ती पूर्ण आगीच्या सपाट्यात सापडली होती. आगीत चारचाकी पूर्ण जळाली असून केवळ सांगाडा शिल्लक आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज