गणपती घेण्यासाठी आले आणि फोन झाला चोरी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२१ । अजिंठा चौक परिसरात गणपती घेण्यासाठी आलेल्या एका इसमाच्या खिशातून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल लांबवण्याचे घटना उघडकीला आले आहे. दरम्यान त्यांच्यासह इतर 3 जणांच्या देखील मोबाईल चोरीला गेल्याचे उघडकीला आले असल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

एमआयडीसी पोलीस स्थानकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण दिपचंद पाटील (वय 40) रा. कुसुंबा रिक्षास्टॉप जवळ जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. काल शुक्रवारी 10 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कुटुंबीयांसह अजिंठा चौफुलीवर गणपती घेण्यासाठी आले होते. गणपती घेत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शर्टाच्या खिशातुन 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला.  त्यांच्यासह इतर 3 जणांचे देखील 3 मोबाईल असे एकूण 20 हजार रुपये किमतीचा 4 मोबाईल लांबवले असल्याचे उघडकीला आले आहे.

 

पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar