वाहनांमधून डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । जिल्ह्यात गेल्या वर्षांपासून महामार्गावर, तसेच ट्रान्सपोर्टच्या ठिकाणी पार्किंग केलेल्या वाहनामधून डिझेल चोरीचे सत्र सुरु होते. यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. रईस हाशिम शेख (वय ३६,रा.भिवंडी,जि.ठाणे),रुबाब अली जलील अहमद (वय ३३.रा.मोहुआ बुजूर्ग,जि.कुशीनगर, उत्तर प्रदेश) व अनिल सुभाष सरोदे (वय ३२,अंजूर,भिवंडी,जि.ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचे नाव आहे.त्यांच्याकडून ४५० लिटर डिझेल,चारचाकी वाहन,डिझेल चोरीसाठी लागणारे साहित्य असा एकूण ४ लाख ७९ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई वरणगावनजीक करण्यात आली.

हा प्रकार जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात सुरु होता. मात्र,चोरटे हाती लागत नव्हते. खबऱ्यांकडूनही माहिती मिळत नव्हती. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याकडे हे प्रकरण सोपविले होते. बकाले व सहकाऱ्यांनी काढलेल्या माहितीत अशा प्रकारचे गुन्हे करणारे आंतरराज्य व राज्यातील असल्याची माहिती प्राप्त झाली होती.उपनिरीक्षक अमोल देवढे,सहायक फौजदार अशोक महाजन,युनूस शेख,सुनील दामोदरे,जयंत चौधरी,दीपक पाटील,महेश महाजन,नंदलाल पाटील,प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर,भगवान पाटील,रवींद्र पाटील,राहुल बैसाणे,सचिन महाजन,अशोक पाटील व मुरलीधर बारी यांचे वेगवेगळे पथक नियुक्त केले होते.

महामार्गावर लावला सापळा

१ ) भुसावळ ते मुक्ताईनगर दरम्यान महामार्गावर वरणगावनजीक एका ढाब्यावर डिझेल चोरी करणारी टोळी आल्याची माहिती मिळाली.निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्वतः पथकासह घटनास्थळ गाठले असता तेथे एम.एच.०४ डी.के.७१७० क्रमांकाची चारचाकी मिळून आली.

२) गाडीत डिझेल चोरीसाठी लागणारे साहित्य व डिझेलही मिळून आले. वरील तिघांना ताब्यात घेऊन खाकी हिसका दाखविला असता,त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -