चाळीसगावात अल्पवयीन तरूणीवर सामूहिक अत्याचार; दोघं नराधमांना अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । चाळीसगाव अल्पवयीन तरूणीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना काल चाळीसगावात घडली. दरम्यान या घटनेने संपूर्ण चाळीसगाव हादरले असून चाळीसगावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी काल 21 रोजी रात्री उशिरा तातडीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोघा नराधमांच्या विरोधात पळवून नेऊन बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची अधिक माहिती अशी की 16 वर्षीय शालेय अल्पवयीन तरुणीला पैशाचे आमिष दाखवून मोटरसायकलवर बसवून तिला करगाव रोड परिसरात अज्ञातस्थळी असलेल्या पडीत घरात नेऊन आरोपी शेख सलीम शेख वजीर व हमीद बिरीम पिंजारी (दोघे राहणार सुवर्णाताई नगर चाळीसगाव) यांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केले.तरुणीला त्रास होऊ लागल्याने घडलेला सर्व प्रकार पीडित तरुणीने तिच्या आईला सांगितला. दरम्यान आईने नातेवाईकांना घेऊन शहर पोलिस ठाणे गाठले.आणि महिला पोलीस कर्मचारी आणि दक्षता समिती सदस्या सौ प्रतिभा पाटील यांच्यासमोर तरुणीचे जाब जबाब नोंदवण्यात आले. तरुणीने सर्व आपबिती सांगितल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा कलम- 376, डी ,ए 354 ए,366 ए 363, 45 ग 6 (8) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींना अटक केल्यानंतर आज त्यांना जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांच्या व पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज