fbpx

जळगाव उपविभागात जुगारावर धडक कारवाई, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । जिल्ह्यात अक्षयतृतीयेच्या दिवशी जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जातो हे लक्षात घेत जळगाव उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने आपल्या उपविभागात विविध कारवाया केल्या. एमआयडीसी, रामानंद, तालुका, शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराच्या आणि अवैध दारू विक्रीच्या कारवाया करण्यात आल्या. पथकाने तब्बल १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे.

तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील आव्हाणे या गावी सरपंच पतीसह एकुण १२ जणांवर जुगाराची कारवाई करण्यात आली. या धाडीत 3 लाख 36 हजार 530 रुपये रोख, 11 मोबाईल व 4 मोटार सायकली जप्त करण्यात आले आहेत. एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील हुडको परिसरातील धाडीत 31 हजार 970 रुपये रोख, 4 मोबाईल व 9 जुगारी ताब्यात घेण्यात आले आहेत. एमआयडीसी शिरसोली भागातील धाडीत 1 लाख 59 हजार रुपये रोख, 3 मोबाईल व तिन जुगारी ताब्यात घेण्यात आले आहेत. शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील धाडीत 23 हजार 670 रुपये रोख, 2 मोबाईल व 6 जुगारी ताब्यात घेण्यात आले आहेत. एमआयडीसी व्ही सेक्टर भागातील धाडीत 14 हजार 516 रुपये रोख, 4 मोबाईल व 7 जुगारी ताब्यात घेण्यात आले आहेत. रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील शिव कॉलनी भागातील धाडीत 12 लाख 80 हजार 820 रुपये रोख, 4 फोर व्हिलर, 3 मोटार सायकली, 7 मोबाईल व 7 जुगारी ताब्यात घेण्यात आले आहेत. याशिवाय दोन ठिकाणी प्रोव्हिबीशन कारवाई करण्यात आली असून त्यात 1650 रुपये रोख व 1 जण ताब्यात घेण्यात आला आहे.

या पथकाने केली कारवाई

सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्यासह सहायक फौजदार भटू नेरकर, हे.कॉ. रामचंद्र बोरसे, कमलेश नगरकर, मनोज दुसाने, किरण धमके, विजय काळे, राजेश चौधरी, कैलास सोनवणे, पोलिस नाईक सुहास पाटील, महेश महाले, सुहास पाटील, पो.कॉ. रविंद्र मोतीराया, प्रसाद जोशी यांचा पथकात समावेश होता.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज