fbpx

ग. स. सोसायटीतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाखांचा मदत निधी

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ मे २०२१ । जळगाव येथील जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग. स. सोसायटीतर्फे कोरोनाच्या प्रतिकारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जाहिर केलेला 11 लाख 11 हजार 111 रूपयांच्या मदत निधीचा धनादेश आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे सुपूर्द केला.

गेल्या महिन्याच्या अखेरीस ग. स. सोसायटी, जळगावतर्फे कोरोनाच्या प्रतिकारासाठी जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई, सोसायटीचे विजयसिंह गवळी, प्रशांत विरकर, एस. आर. पाटील, भाऊसाहेब महाले, एन. एस. पाटील, हेमंत नारखेडे आदिंच्या उपस्थितीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा धनादेश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचेकडे सुपूर्द केला होता.

mi advt

पालकमंत्री ना. पाटील यांनी आज हा धनादेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, परिवहन मंत्री ॲङअनिल परब आदि उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज