fbpx

चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२१ ।  मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला चोरीच्या गुन्ह्यात दाखल व फरार असलेला आरोपीस जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. प्रदिप दिलीप भिल्ल (रा. पिंप्री अकराऊत – मुक्ताईनगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत असे की,  अटकेतील प्रदिप भिल्ल याच्या विरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गु.र.न. 223/18 भा.द.वि. 379, 34 नुसार गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हा घडल्यापासून व दाखल झाल्यापासून तो फरार होता. दरम्यान, आरोपी प्रदिप भिल्ल हा घरी आला असून तो शेतीकाम करत असल्याची माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक ओंकार महाजन,पोलिस नाईक दिपक शांताराम पाटील, नंदलाल दशरथ पाटील, प्रमोद अरुण लाडवंजारी, पो.कॉ. भगवान तुकाराम पाटील, सचिन प्रकाश महाजन यांनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील आरोपी प्रदिप भिल्ल यास पुढील तपासकामी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज