फळपिक विमा रक्कम मंजूर ; जिल्ह्यातील 12847 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार रक्कम

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२१ । प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना, सन २०२०-२१ अंतर्गत अंबिया बहार याेजनेमध्ये जिल्ह्यातील केळी, डाळिंब, मोसंबी या फळपिकांचा विमा शेतकऱ्यांनी काढलेला होता. या अनुषंगाने खासदार उन्मेष पाटील विमा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तात्काळ विम्याची मंजूर रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याबाबत यांनी कृषी सचिवांना पत्र दिले होते.

त्यानुसार विमा कंपनीमार्फत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील १२ हजार ८४७ पात्र विमाधारक शेतकऱ्यांना २८ कोटी ३ लाख ६२ हजार ३४६ रुपयांची मदत मंजूर झाली आहे. लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात जमा हाेणार आहे. ऐन दिवाळीत मदत मंजूर झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

विम्याची मंजूर रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे आर्थिक नुकसान झाले होते. मदतीमुळे दिलासा मिळणार आहे.

रक्कम पात्र लाभार्थी तालुका व पिकनिहाय खलील प्रमाणे 

भडगाव 51 शेतकरी रू.5,09,924/- चाळीसगाव 12 शेतकरी रू.4,42,395/- धरणगाव 34 शेतकरी रू.5,78,685/- एरंडोल 5 शेतकरी रू.1,02,242/- जळगाव 3411 शेतकरी रू.6,96,34,431/- पाचोरा 245 शेतकरी रू.58,21,761/- पारोळा 2 शेतकरी रू.5700/- रावेर 2969शेतकरी रू.6,08,27,512/- मुक्ताईनगर 1633 शेतकरी रू.4,54,86,945/- जामनेर 44 शेतकरी रू.10,45,372/- चोपडा 1364 शेतकरी रू.2,77,59,165 भुसावळ 18 शेतकरी रू.3,90,225/- बोदवड 18 शेतकरी रु.2,61,900/- यावल
3041 शेतकरी रू.6,74,96,089/-

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज