fbpx

भरधाव गाडीच्या धडकेत मालवाहतूक चालकाचा मृत्यू

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील खडकीच्या दिशेने जात असलेल्या मालवाहतूक गाडीला भरधाव टाटा कंपनीच्या गाडीने जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पातोंडा गावाजवळ घडली असून याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील खडकी येथील राकेश दत्तू देसले (वय-२९) रा. खडकी ता‌. चाळीसगाव हा मालवाहतूक गाडी चालवित (क्र. एम.एच‌४१ जी ६५६७) खडकी गावाच्या दिशेने जात असताना पातोंडा गावाजवळील वळणावर चाळीसगाव कडून भरधाव वेगाने येणार्या टाटा कंपनीच्या गाडीने (क्र. एम.एच.०४ इ.एल. २८७०) जोरदार धडक दिला.

झालेल्या अपघातात राकेश दत्तू देसले (वय-२९) याचा दुदैवी मृत्यू झाला आहे. सदर अपघात हा शुक्रवार रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पातोंडा गावाजवळील वळणावर घडला आहे. दरम्यान अपघात घडताच अज्ञात चालक हा पसार झाला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सदर मृतदेहाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. रतन श्रीपत पाटील रा. खडकी ता. चाळीसगाव याच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, १३४ (बी) व मोटार वाहन अधिनियम १८४ प्रमाणे अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास अनिल अहिरे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt