डॉक्टरांनी केले मोफत उपचार, पोलीस पत्नीने उचलला औषधींचा खर्च

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२१ । आजच्या महागाईच्या काळात देखील माणुसकी जिवंत असल्याची उदाहरणे समोर येत असतात. जळगावातील डॉ.समीर चौधरी व पोलीस कर्मचारी सुधाकर अंभोरे यांच्या पत्नी लहुजी ब्रिगेडच्या महिला प्रदेशाध्यक्षा आशा अंभोरे यांनी असेच एक आदर्श कार्य केले आहे.

यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील रहिवासी असलेल्या विवेक एकनाथ कोळी हा विद्यार्थी शेतात काम करीत असताना विळयाने त्याच्या हाताची नस कापली गेली. निसर्गाच्या अवकृपेने पीकपानी नाही, खिशात पैसे नाही, उपचार करायचे कसे? असे प्रश्न घेऊन पालकांनी जळगाव गाठले.

जळगावातील डॉ.समीर चौधरी यांनी माणुसकीचा हात देत विवेकवर मोफत शस्त्रक्रिया केली. तसेच एलसीबीचे कर्मचारी सुधाकर अंभोरे यांच्या पत्नी लहुजी ब्रिगेडच्या महिला प्रदेशाध्यक्षा आशा अंभोरे यांनी विवेकच्या औषधींचा सर्व खर्च उचलला. संपूर्ण बरा झाल्यावर विवेकला सुट्टी देण्यात आली. डॉ.समीर चौधरी व आशा अंभोरे यांनी दाखविलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज