fbpx

‘या’ व्यक्तींसाठी एसटीमध्ये मोफत प्रवासाची सवलत ; जिल्ह्यातील ७० लोकांनी घेतला लाभ

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२१ । मोफत व सवलतीत प्रवासासाठी एसटीच्या विविध योजना असूनही नागरिकांना या योजनांविषयी माहिती नाही. दरम्यान, डायलिसिसचे रुग्ण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्यक्तींना एसटीत मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली असून या सवलतीचा फायदा घेऊन जुलै महिन्यात जिल्ह्यात ७० लोकांनी एसटीने मोफत प्रवास केला आहे.

या विनामूल्य प्रवासाच्या सवलतीचा सवलतीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्यक्तीसह एक साथीदाराला देण्यात येणार आहे. या योजनेनुसार दोघांना महामंडळाच्या सर्वसाधारण, निम आराम, आराम या गाड्यांतून विनामूल्य प्रवासाची मान्यता देण्यात आली आहे. डायलेसीस रुग्णाला देखील साध्या व निमआराम (हिरकणी) बसमध्ये १०० टक्के सवलतीत प्रवास करता येणार आहे. ही सवलत वैद्यकीय उपचार, वैद्यकीय शिबिर आदी कारणांसाठी देण्यात येते. यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यावर त्याची पडताळणी झाल्यावर स्थानक प्रमुख सवलत देण्याबाबत स्वाक्षरी करतील. पात्र लाभार्थ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

१०० कि.मी. मर्यादा

डायलेसीसच्या रुग्णांना सवलतीसाठी १०० किलोमीटर प्रवासाची मर्यादा आहे. प्रवासावेळी वाहकाडून सवलतीची कागदपत्रे तपासल्यावर ही सवलत देण्यात येत आहे. सवलत प्राप्त व्यक्तीने कागदपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.

नीलेश पाटील, आगारप्रमुख, जळगाव

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज