आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूकांसाठी मोफत प्रशिक्षणाची संधी

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधित उध्दभवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे. या क्षेत्रातील संसाधनामधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा याकरिता आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी भारत सरकारव्दारा प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण 3.0 योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 18 ते 45 वयोगटातील एकूण 450 बेरोजगारांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण ऑन जॉब ट्रेनिंग स्वरुपाचे असेल, प्रशिक्षणानंतर प्रशिक्षित उमेदवारांना शासनातर्फे प्रमाणपत्र प्राप्त देण्यात येईल तसेच त्यांना आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी गुगल लिंक वर आपली माहिती/नोंदणी ऑनलाईन सादर करावी. नोंदणी करताना समोर नमूद शैक्षणिक पात्रतेनुसार कोर्स/जॉब रोल निवडावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. 0257-2959790 वर संपर्क साधावा. असे वि. जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

गूगल लिंक :-
https://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLSeWOam६q-९D-wedbHbknkC७RZ४oOoz५३XIbqOyfmFYKuuONQ/viewform?usp=pp-url

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज