डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात नि:शुल्क शस्त्रक्रिया अभियानास सुरुवात

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ३० जानेवारी या पुण्यतिथीचे औचित्य साधून १ जानेवारीपासून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात नि:शुल्क शस्त्रक्रिया अभियानास सुरुवात झाली आहे. अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या अभियानात विविध आजारांवरच्या शस्त्रक्रिया करण्यात येत असून आतापावेतो २५ हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच ३५० हून अधिक रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी नावनोंदणी करण्यात आली आहे.

जळगाव, बुलढाणा जिल्हावासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोविड पश्चात उत्‍तम आरोग्य सेवा मिळून देण्याच्या उद्देशाने गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाने एक पाऊल उचलले आहे. या अभियानातर्गत तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शिवाजी सादुलवाड यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ.अनिष जोशी, डॉ.श्रेयस सोनवणे, डॉ.वरुण देव, डॉ.वैभव फारके, डॉ.शुभम मानकर, स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. जया सावरकर, डॉ.शुभांगी चौधरी, डॉ.महेश देशमुख, अस्थिरोग विभागप्रमुख डॉ.दिपक अग्रवाल, डॉ.प्रमोद सारकेलवाड यांच्यामार्गदर्शनाखाली डॉ.सुनित वेलणकर, डॉ.परिक्षीत पाटील, न्यूरोसर्जन डॉ.स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.गजानन गवळी, कान नाक घसा विभागात डॉ.अनुश्री अग्रवाल यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ.विक्रांत वझे, डॉ.पंकजा बेंडाळे, डॉ.हर्षल, डॉ.श्रृती तज्ञ उपचार देत आहे.

खालील आजाराची लक्षणे असलेल्यांनी त्वरीत रुग्णालयाशी संपर्क साधावा आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्‍ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आशिष भिरुड – ९३७३३५०००९, रत्नशेखर जैन – ७०३०५७११११, दिपक पाटील ९४२२८३७७७१, दिक्षा सुरे ९६८९६८०९०१ यांच्याशी संपर्क साधावा.

या आजारांवर शस्त्रक्रिया : या अभियानांतर्गत प्रोस्टेट, किडनी स्टोन, मुत्रपिंडातील खडे, स्तनाचा कर्करोग, स्तनाच्या गाठी, गर्भपिशवी शस्त्रक्रिया, संतती नियमन, गुडघ्याचे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, कृत्रिम सांधेरोपण, हातापायांचा वाकडेपणा, मुखाचा कर्करोग, फुफुसाचा कर्करोग, गळ्याचा कर्करोग, अंडकोष व जांघेवरील सुज, आतड्यांचे आजार, नाभीतील सुज, पित्‍ताशयाचे आजार, अन्ननलिकेचे आजार, पोटातल्या गाठी, ट्यूमर, लघवी विकारांच्या शस्त्रक्रिया, आतड्यांचे क्षयरोग, अल्सर, फिशर, पाईल्स, भगंदर, डायबेटिक, थायरॉईड, प्लीहा आदि आजारांवर महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार आणि आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया केल्या जात आहे.

रूग्णांची आरोग्य तपासणी : शस्त्रक्रिया अभियानात रूग्णांसाठी आवश्यक त्या तपासण्यांची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय, रक्ताच्या विविध तपासण्या, हृदयाशी संबंधीत टुडी इको, एन्जीओग्राफी ह्या सर्व सुविधा उपलब्ध असल्याने रूग्णाचा वेेळ वाचणार आहे. तसेच रूग्णालयातच रूग्णांच्या सोयीसाठी स्वतंत्र औषधालयाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांनी सोबत येतांना आधारकार्ड आणि रेशनकार्ड आवश्यक आणावे.

अनुभवी डॉक्टरांची टिम नियुक्त : शस्त्रक्रिया अभियानासाठी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात निष्णात आणि अनुभवी डॉक्टरांची स्वतंत्र टिम नियुक्त करण्यात आली आहे. या टिममधील डॉक्टरांकडुन रूग्णावर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. वेगवेगळ्या शस्त्रक्रियांसाठी स्वतंत्र आणि प्रशस्त निर्जंतुक ऑपरेशन थिएटरचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रूग्णांच्या सोयीसाठी समन्वयक : शस्त्रक्रिया अभियानांतर्गत रूग्णालयात उपचारासाठी दाखल होणार्‍या रूग्णांसाठी समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली आहे. केसपेपर काढण्यापासून ते रूग्णाला उपचार मिळेपर्यंतची जबाबदारी या समन्वयकांवर देण्यात आली आहे. कुटूंबातील सदस्यांप्रमाणे रूग्णाची काळजी घेण्याचे काम हे समन्वयक करणार आहेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -