fbpx

नेत्रज्योती हॉस्पिटलतर्फे फ्री तपासणी शिबीराचे आयोजन

जळगाव येथील संत बाबा गुरूदासराम चॅरिटेबल ट्रस्ट संचलित नेत्र ज्योती हॉस्पीटल जळगांव तर्फे संत बाबा गुरूदासराम यांची ९० व्या जन्मोत्सवानिमित्त दि. १५ जुन मंगळवार रोजी फ्री भव्य नेत्र तपासणी, दंत तपासणी, जनरल तपासणी व फिजिओथेरपी शिबीर सकाळी ९ ते संध्या. ६.३० वाजेपर्यंत आणि जनरल तपासणी (सकाळी ९.३० ते दु. १.३० आणि संध्या. ५ ते रात्री.९ वाजेपर्यंत) आयोजित करण्यात आले आहे. सोबतच भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन सकाळी ९.३० ते २ या वेळेत आयोजित केले आहे.

सदर शिबीरात ज्या रुग्णांच्या मोतीबिंदुचे ऑपरेशन नक्की होईल त्यांचे ऑपरेशन इंडियन लेन्स टाकुन फ्री करण्यात येईल. त्याचबरोबर रक्त तपासणी सुद्धा फ्री करण्यात येत आहे त्यासाठी तुषार पथोलॉजी चे डॉ. तुषार बोरोले यांचे सहकार्य लाभले, तसेच औंगाबादमधील सुप्रसिद्ध ओरल सर्जन तज्ञ डॉ. दिपक मोटवानी यांचेकडुन दंत रोपण शस्त्रक्रियेबद्दल विशेष सुट दिली जाईल त्यासाठी रुग्णांनी हॉस्पिटल शी संपर्क करावा.

तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा. अशी विनंती ट्रस्टचे चेअरमन डॉ. गुरुमुख जगवानी, उपाध्यक्ष दिलीपकुमार मंघवानी, सेक्रेटरी डॉ. मूलचंद उदासी व समस्त ट्रस्टी गण यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज