fbpx

भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशनतर्फे निशुल्क ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ । गेल्या दीड वर्षांपासून सर्व नागरिक कोरोना सारख्या आजाराला धीराने तोंड देण्याचा प्रयत्न करीत आहेत, या आजारात अनेकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे, गेल्या काही दिवसात रुग्णालयात बेड न मिळणे, ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध न होणे, जीवरक्षक औषधी व इंजेक्शन चा तुटवडा यामुळे अनेक कुटुंबाने जिवाभावाची माणसं गमावली आहेत, तर अजूनही असंख्य लोकांची विविध प्रकारच्या उपचारासाठी धावपळ सूरु आहे, आज गृह विलगीकरणात असलेल्या बऱ्याच रुग्णांना ऑक्सिजन कंसेंटेटर ची गरज आहे आणि ही गरज पूर्ण करता यावी यासाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन आणि विनमार ओव्हरसीज पॉलीमर्स प्रा. लि., मुंबई च्यावतीने 25 ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सदरची हे मशीन कांताई नेत्रालयात उपलब्ध राहणार असून ज्या रुग्णांना याची गरज भासते आहे त्यांनी रुग्णास ऑक्सिजन ची गरज असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, किती लिटर ऑक्सिजन ची गरज आहे त्याचा तपशील ज्या रुग्णासाठी हवे आहे त्यांचे आधारकार्ड, पूर्ण पत्ता व इतर आवश्यक तपशील मशीन नेणाऱ्याचे आधारकार्ड, ओळख असणाऱ्या व्यक्तीचा संपूर्ण तपशील सादर करणे गरजेचे असेल. या फौंडेशनच्या वतीने निशुल्क दिली जाणारी ऑक्सिजन मशीन ही 5 लिटर क्षमतेची असणार आहेत. रुग्णास लागणाऱ्या ऑक्सिजन कंसेंटेटरची गरज नसल्याचे चित्र लक्षात आल्यावर हे ऑक्सिजन कंसेंटेटर कांताई नेत्रालयास परत करावयाचे आहे .

mi advt

ऑक्सिजन कंसेंटेटर अभावी कोणत्याही रुग्णास आपला जीव गमवावा लागू नये याच भावनेतून भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशनच्या वतीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ऑक्सिजन कंसेंटेटरची गरज असणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांनी ऑक्सिजन कंसेंटेटरच्या उपलब्धते बाबत विजय मोहरीर (९४२३७७४३४६), सुधीर पाटील (९८२३३६२३३०), उदय महाजन (९४२२७७६७०८), अनिल जोशी (९४३२५९४४८७), नितीन चोपडा (९४२३४८९८२४), अमर चौधरी (९३७२४०९४६८) डॉ. प्रदीप ठाकरे (९४२२७७५९०६) कांताई नेत्रालय, निमखेडी रोड येथे संपर्क करावा असे आवाहन फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज