fbpx

यावल व रावेर रिक्षा चालकांचे मोफत ऑनलाईन नावनोंदणी : डॉ. कुंदन फेगडे

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२१ । कोरोना काळातील लॉकडाऊनच्या आर्थिक संकटात सापडलेले परवानाधारक रिक्षा चालकांना १५०० रू सानुग्रह अनुदान योजना राज्य शासनाने जाहिर केला आहे. या योजनेचा लाभ यावल व रावेर तालुक्यातील रिक्षाचालक यांना मिळावा यासाठी नगरसेवक डॉ कुंदन फेगडे यांनी ऑनलाईन मोफत अर्ज भरून देण्यासाठी नावनोंदणी कक्ष उभारणी केली आहे.

कोरोना विषाणुसंसर्गाच्या महामारी संकटातील लाँकडाऊनच्या परिस्थितीमुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या राज्यातील रिक्षा चालकांनकुरिता राज्य शासनाने राज्यातील ७लाख ५ हजार रिक्षा चालकांसाटी १५०० रू प्रमाणे सानुग्रह देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी निःशुल्क रिक्षाचालकांच्या नांव नोदणीसाठी यावलचे नगरसेवक डॉ कुंदन फेगडे  यांनी यावल येथे नाव नोंदणी साठी आँनलाईन कक्ष उभारणी केली आहे. या कोरोना लाँकडाऊनच्या आर्थिक संकटात सापडलेल्या परवानाधारक सर्वसामान्य रिक्षा चालकांना १५०० रू प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आँनलाईन यांनी अर्ज भरून देण्यासाठी डॉ कुंदन फेगडे यांच्या तर्फे निःशुल्क सेवा कक्ष दि २६ मे २०२१ पासून सुरू करण्यात आले आहे यावल व रावेर या तालुक्यातील रिक्षाचालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ कुंदन फेगडे यांनी केले आहे

येथे करता येईल नावनोंदणी?

यावल भुसावळ टी पाँईन्टजवळ असलेल्या आई हाँस्पिटल बाजूला श्री कलेक्शन खाली उभारण्यात आले आहे. नाव नोंदणी कक्षात तात्काळ आपल्या नावाची आँनलाईन नोदनी करून घ्यावी. पुढील माहीतीसाठी डॉ कुंदन फेगडे यांचे संपर्क प्रमुख सागर लोहार मे ९१५८३२५१४३ आणि रितेष बारी मो. क्र ७४९९४१९४९६ यांच्याशी संपर्क साधून या अनुदानाविषयी अधिक माहिती जाणून घ्यावी व आपल्या नांवाची तात्काळ नोंदणी करून घ्यावी व महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा असे डॉ कुंदन फेगडे यांनी यावल व रावेर रिक्षाचालक यांच्या साठी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज