कामगार कल्याण मंडळाच्यावतीने मोफत नेत्र तपासणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ललित कला भवनच्यावतीने औद्योगिक वसाहतीतील छबी इलेक्ट्रिकल कंपनीत कर्मचाऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने कामगारांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून औद्योगिक वसाहतीतील छबी इलेक्ट्रिकल कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. कंपनीचे एमडी छबीराज राणे यांच्या अध्यक्षतेखाली या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर, कृती फाउंडेशनचे कार्याध्यक्ष व पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, पत्रकार चेतन निंबोळकर, जिल्हा पोलीस दलातील संघपाल तायडे, सुरेश राजपूत, कामगार कल्याण निरीक्षक भानुदास जोशी आदी उपस्थित होते.

शिबिरात डोळ्यांचे आजार वाढू नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कंपनीतील पुरुष, महिला तसेच जेष्ठांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. शिबिराला कृती फाउंडेशन जळगाव, प्रभाकर पाटील नेत्रालय जळगाव, डॉ.चंदन चौधरी, शांताराम राखुंडे यांचे सहकार्य लाभले. शिबिराचे प्रास्ताविक कामगार कल्याण निरीक्षक भानुदास जोशी यांनी केले तर आभार कंपनीचे एमडी छबीराज राणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रभाकर पाटील, नेत्रालयाचे सहाय्यक मनीषा भारुडे, मदतनीस शैलेंद्र कोळी आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज