महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे मोफत कोविड लसीकरण

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२१ । महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जळगांव जिल्ह्याच्या वतीने तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या पुढाकाराने शहरातील भास्कर मार्केट येथे कोविड -१९ लसीकरण शिबिर घेण्यात आले. पहिल्या दिवशी १६० नागरिकांना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला.

शिबिरासाठी शासकीय रुग्णालयाचे डॉ. रोहित देसाई, कन्हैया मोरे, रितेश नेवे यांनी परिश्रम घेतले. कोविड लसीकरणाची सुरुवात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संपर्क प्रमुख कुणाल मोरे यांच्या लसीकरणाने झाली. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश कांबळे, उपाध्यक्ष आरिफ पिंजारी, जनसंपर्क अधिकारी चेतन निंबोळकर, वाहतूक आघाडीचे अकील शेख, विद्यार्थी आघाडीचे राहुल सूर्यवंशी, किरण राजपूत, दिलीप साळुंखे, मनोज सपकाळे, भूषण सुरळकर आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -