fbpx

चौथी राष्ट्रीय हातमाग गणना विणकरांनी नोंदणी करण्याचे आवाहन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२१ । चौथी राष्ट्रीय हातमाग गणना-2017 संपूर्ण भारत देशात आयोजित करण्यात आलेली होती. या गणनेचे काम महाराष्ट्र राज्यामध्ये मे. कर्वी डाटा मॅनेजमेंट सर्व्हीस लि. हैद्राबाद या संस्थेमार्फत पूर्ण झालेले आहे.

मात्र हातमाग गणनेतून सुटलेले/अनावधानाने राहिलेले हातमाग विणकरांना समाविष्ट करण्यासाठी सर्व हातमाग विणकर तसेच संलग्न विणकर/मजूर यांना अंतीम संधी देऊत आवाहन करण्यात येत आहे की, अद्याप ज्या विणकरांचा समावेश हातमाग गणनेत झालेला नसेल त्यांनी विहित नमुन्यात संपूर्ण माहिती भरुन छायांकित कागदपत्रे जोडून प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई, 7 वा मजला, चरई टेलिफोन एक्स्चेंज बिल्डींग, मावळी मंडळ रोड, ठाणे (पश्चिम) 400601, दुरध्वनी क्रमांक- 022-25405363 या पत्तावर व rddtextiles३[email protected] या ईमेलव्दारे 10 दिवसांच्या आत पाठविण्यात यावी. असे सु. म. तांबे, प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt