चाळीसगावात चार वर्षीय बालिकेवर अत्याचार; नराधमास अटक

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । चाळीसगाव शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात एका चार वर्षीय बालिकेला बिस्किट पुडा खायला देतो असे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना काल रात्री घडली. सावळाराम भानुदास शिंदे (लोंढे तालुका नांदगाव जिल्हा नाशिक) असे संशयित नराधमाचे नाव असून हा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना लोकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर स्थानिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. या घटनेप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळ 14 वर्षीय बालिकेला बिस्किट पुडा खायला देतो असे आमिष दाखवून तिच्यावर नराधमाने अत्याचार केला. हा प्रकार शनिवारी रात्री नऊ ते दहा वाजताच्या सुमारास घडला. याप्रकरणी चाळीसगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकार लोकांच्या लक्ष्यात येतात त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या नराधमाला पकडून चांगलाच चोप दिला. दरम्यान चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर यांनी पीडित चिमुरडीवर अत्याचार झाल्याचं सांगत तिला इजा झाल्याचं सांगितलं. त्यामुळे तिला पुढील उपचार करण्यासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

याप्रकरणी संशयित आरोपी सावळाराम भानुदास शिंदे  याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 363, 366,(अ) 376(ए बी)व पोस्को कायदा अंतर्गत 4,5 (एम) 6,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विशाल टकले हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -