दुर्दैवी… कार-दुचाकीची धडक, गर्भवती महिलेसह चौघे ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२१ ।  भरधाव कारने दुचाकीला उडविल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले असून तीन जखमी झाल्याची घटना आज दुपारी चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी गावाजवळ घडलीय. या अपघातातील मृतांमध्येदोन पुरुष, एक महिला आणि एक बालिकेचा समावेश आहे.

याबाबत असे की, चाळीसगाव येथून नांदगावच्या दिशेने दुचाकीवरून दोन पुरुष, एक महिला आणि एक बालिका जात होते. दरम्यान, तालुक्यातील रोहिणी गावाजवळ हॉटेल नक्षत्रच्या पुढे एका भरधाव वेगाने धावणार्‍या स्वीफ्ट कारने या दुचाकीला उडविले. यात दुचाकीवरील चारही जण जागीच ठार झाले, तर कारमधील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. 

अपघाताची माहिती मिळताच परिसरातून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतांची ओळख पटली नसून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, जखमी जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्याचे कळते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज