वीटभट्टी व्यावसायीकावर हल्ला करणाऱ्या चौघांना अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२१ । वीटा घेण्याच्या बहाण्याने बोलवत वीटभट्टी व्यावसायीकावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी फैजपूर पोलिसांकडून चार संशयित तरुणांना अटक करण्यात आली आहे. दि.१७ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती.

फैजपूर शहरातील वीटभट्टी व्यावसायीक आकाश संतोष कापडे यांना वीटा घेण्याच्या बहाण्याने बोलवत दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी घडली होती. या मारहाणीत रॉडचा वापर करण्यात आल्याने आकाश कापडे हे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी कापडे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गेल्या २० दिवसांपासून पोलिसांकडून हल्ला करणाऱ्या तरुणांचा शोध घेतला जात होता. बुलढाणा, मुक्ताईनगर, पहूर, शेंदुर्णी, भुसावळ, फैजपूर आदी ठिकाणी चौकशी केल्यानंतर अखेर शनिवारी सकाळी लखन एकनाथ मंडवाले (रा. फैजपूर), गोपाळ मधुकर सुरळकर (रा. जळगाव खुर्द), राकेश प्रकाश मोरे व आकाश रमेश मस्के (दोघेही रा. कंडारी, भुसावळ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पूर्ववैमनस्यातून केला हल्ला
सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, फौजदार मसलुउद्दीन शेख, पोलीस नाईक किरण चाटे, महेंद्र महाजन, उमेश चौधरी, योगेश महाजन, चेतन महाजन व पोलीस अधीक्षक कार्यालयातील संदीप सावळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. लखन मंडवाले याच्याशी असलेल्या पूर्ववैमनस्यातून कापडे यांच्यावर जळगाव व कंडारी येथील तरुणांमार्फत हल्ला करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली असून या चौघांच्या आणखी एका साथीदारांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज