पारोळ्याच्या माजी नगरसेवकाचा दुचाकीवरून खाली पडल्याने मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२१ । पारोळा शहरातील माजी नगरसेवक रवींद्र भगवान चौधरी यांचा दुचाकीवरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. याबाबत शिवदास चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी चालक भय्या सुदाम चौधरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, माजी नगरसेवक रवींद्र चौधरी हे शेतातून भय्या सुदाम चौधरी यांच्या दुचाकीवर बसून घरी येत होते. दरम्यान, धरणगाव रस्त्यावरील योगेश चौधरी यांच्या शेताजवळ कुत्रे आडवे आल्याने दुचाकी घसरल्याने रवींद्र चौधरी खाली कोसळून गंभीर जखमी झाले. त्यांना कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याबाबत शिवदास चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व पोलिस तपासावरुन दुचाकी चालक भय्या चौधरी याच्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज