fbpx

जळगाव विधानसभेच्या रिंगणात उतरणार माजी आ.मनीष जैन?

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२१ । विधानसभा निवडणुकीला अद्याप तीन वर्ष बाकी असले तरी जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे. जळगाव शहरातून माजी आमदार मनिष जैन हे देखील निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून त्यांच्या समर्थकांनी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

जळगाव शहर विधानसभा मतदार संघात या वर्षी राजकारणाची खिचडी झाली असून पुढील युती, आघाडीचे समीकरण निश्चित नसली तरी अनेकांनी आतापासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक जण इच्छुक असून सध्या सोशल मीडिया कॅम्पेनवर भर दिला जात आहे. जळगाव शहर मतदार संघातून काही दिवसांपूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर या उमेदवारी लढवणार असल्याची चर्चा रंगत होती परंतु आता अचानक माजी आमदार मनीष जैन यांचे नाव समोर येऊ लागले आहे.

mi advt

manish jain whatsapp group

मनिष जैन यांच्या समर्थकांनी सोशल मीडियात आणि आपल्या स्तरावर जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून मनीष जैन हे देखील मतदार संघातील काही पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असल्याचे समजते. राष्ट्रवादीकडून गेल्या वर्षी विधानसभा निवडणूक लढवलेले महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनीदेखील हजारो मते मिळवून आपले अस्तित्व जोरदारपणे दाखवून दिले होते.

भाजपकडून सध्या विद्यमान आमदार सुरेश भोळे यांचेच नाव चर्चेत असले तरी इतर पक्षांकडून मात्र अनेकांची नावे पुढे येत आहेत. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यानंतर त्यांच्याच ताकदीचा चेहरा अद्याप समोर आला नसला तरी येणाऱ्या काळात तो चेहरा नक्की समोर येईल हे निश्चित. मनीष जैन यांची उमेदवारी निश्चित झाल्यास शहर विधानसभा मतदार संघाची निवडणूक चुरशीची होईल यात शंका नाही.

कोरोना काळापासून सध्या शेती आणि व्यवसायकडे लक्ष केंद्रित केले आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी कोणी सांगतात विधानसभा लढवा, कोणी सांगतात लोकसभा लढवा त्यांची इच्छा असते. पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहायचं, पक्षाने दिलेले आदेश पाळायचे, कार्यक्रम करायचे सध्यातरी इतकच सुरू असल्याचे माजी आ.मनीष जैन यांनी जळगावला लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज