माजी नगरसेविका अश्विनी देशमुख यांना डॉक्टरेट

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२१ । जळगाव शहरातील माजी नगरसेविका अश्विनी विनोद देशमुख यांच्या कार्याची दखल घेत त्यांना द अमेरिकन युनिव्हर्सिटीने सामाजिक कार्यात डॉक्टरेट सन्मान प्रदान केला आहे. अश्विनी देशमुख यापुढे डॉ.अश्विनी देखमुख म्हणून ओळखल्या जाणार आहेत.

शहर मनपाच्या माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय सदस्या अश्विनी देशमुख यांनी नगरसेवक असतांना आपल्या प्रभागात विविध उपक्रम राबविले होते. तसेच त्यांनी आजवर विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपले समाजकार्य सुरू ठेवले आहे. अश्विनी देशमुख यांच्या कार्याची दखल घेत द अमेरिकन युनिव्हर्सिटी यूएसएतर्फे नुकतेच त्यांना डॉक्टरेट हा सन्मान प्रदान करण्यात आला.

पुणे येथे नुकतेच पार पडलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात अश्विनी देशमुख यांना सामाजिक कार्यातील डॉक्टरेट पदवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी, विद्यापीठाचे संस्थापक डॉ.मधू कृष्णन यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली. अश्विनी देशमुख या यापुढे डॉ.अश्विनी देशमुख म्हणून ओळखल्या जाणार असून त्यांचा सन्मान हा शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा आहे. डॉ.देशमुख यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

डॉ.अश्विनी देशमुख यांच्यासह हॉकीपटू धनराज पिल्ले, गायक कुमार सानू, पलक मुच्चाल, कर्नल शैलेंद्र सिंग, मेजर जनरल अजयपाल सिंग, डॉ.सोमा घोष यांना देखील डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -