मनसे व रोटरी क्लबच्या वतीने पूरग्रस्तांसाठी अन्नसेवा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२१ । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने तसेच उपाध्यक्ष विनायक भोईटे यांच्या मार्गदर्शनाने चाळीसगाव येथील अस्मानी संकट या संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांसाठी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने चाळीसगाव येथील पूरग्रस्तांसाठी अन्न सेवेचे आयोजन करण्यात आले. पूरग्रस्तांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली या भोजनामध्ये भाजी पोळी वरण-भात दशमी खिचडी इत्यादी पोषक पदार्थांचा समावेश करण्यात आला

चाळीसगाव येथील पूरग्रस्तांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख अण्णा विसपुते तालुका अध्यक्ष संग्रामसिंह शिंदे तसेच इतर सदस्य यांनी सकाळपासून केली व माता-भगिनींना तसेच कुटुंब प्रमुखांना धीर दिला या संकटामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी ग्वाही देखील मनसेच्या वतीने देण्यात आली.

तसेच त्यांच्या भोजनाची व पिण्याच्या शुद्ध पाण्याची उत्तम व्यवस्था चाळीसगाव येथील ए बी हायस्कुल मध्ये करण्यात आली याप्रसंगी अण्णा विसपुते संग्राम सिंग शिंदे तसेच सर्व टीम उपस्थित होती. मनसे व रोटरी क्लब च्या या कार्याचे कौतुक सर्व माता भगिनी व त्यांच्या कुटुंब प्रमुखाने केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar