fbpx

यावल येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जून २०२१ । यावल येथील काँग्रेस कमेटीच्यावतीने काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब व गरजूंना बांधवांना अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

शहरातील कॉंग्रेस पक्षाच्यावतीने उद्या दिनांक ५ जुन शनिवार रोजी माजी विधानसभा अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष नानाजी पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त यावल तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे गोरगरीब गरजु बांधवांना अन्नदानाचे तसेच यावल ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ व मिठाई वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.

जिल्हा परिषदचे गटनेते व कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे व जिल्हाध्यक्ष इंटक भगतसिंग देवनाथ पाटील आणि यावल पंचायत समितीचे गटनेता तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील यांच्यासह पक्षाचे आदी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख उपस्थित सकाळी १० वाजता यावल तालुका शेतकी सहकारी संघात व सकाळी १०,३० यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात येणार आहे.

तरी काँग्रेस पक्षाच्या सर्व तालुका व शहर युवक, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तथा पक्षाचे पदाधिकारी आणी कार्यकर्ता यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन कॉंग्रेस कमेटीचे यावल शहराध्यक्ष कदिर खान व शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे व त्यांचे पक्षातीत सर्व सहकाऱ्यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज