फैजपुरात धाडी नदीला पूर; नागरिकांच्या घरांपर्यंत पाणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । रावेर तालुक्यातील फैजपूर शहरात रविवार दि.१७ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे धाडी नदीला पूल आला होता. गटारी तुडुंब भरल्याने शहरातील रस्ते जलमय झाले होते. यामुळे नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचले होते.

फैजपूर शहरात रविवार दि.१७ झालेल्या मुसळधार पावसामुळे धाडी नदीला पूर आला. खंडोबावाडी प्रवेशद्वारासमोर रस्त्यावर प्रचंड पाणी वाहत होते. गावातील सगळ्या गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. प्रभाग क्रमांक एक व दाेनमध्ये गटारी तुडुंब भरल्याने रस्त्यावरून पाणी वाहत होते. पावसाळ्यातही एवढा पाऊस झाला नाही इतका जाेरदार पाऊस रविवारी झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. दरम्यान, शहरातील सगळ्या गटारींचे पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने शहर स्वच्छ झाले आहे. या मुसळधार पावसामुळे परिसरात कुठेही मालमत्तेचे नुकसान झालेले नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज