चाळीसगावात पुन्हा पूर स्थिती, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२१ । तितुर डोंगरी नदीचे उगमस्थानाव पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तितुर नदीला मोठा पूर आला असून चाळीसगाव शहरातील दोघा फुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे जुन्या गावातून नव्या गावाकडे येण्यासाठी शहरातील नागरिकांना आठ कि.मी. फेऱ्याने शहरात यावे लागत आहे.

नदीची पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याबरोबरच नदीकाठावर घरे असलेल्या लोकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे महिन्याभरात तिसऱ्यांदा नदीला मोठा पूर आल्याने व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. दुकानात नवीन माल भरावा की नाही. असा प्रश्न त्यांना सतावू लागला आहे.

शहरातील ॲक्सिस बँक अद्याप सावरलेली नाही आठ दिवसात दोन वेळा अॅक्सिस बँक तळमजल्यात पाणी शिरल्याने बँकेचे मोठे नुकसान झालं आहे. आज देखील व्यवहार सुरळीत झालेले नाहीत पुन्हा पाणी भरल्यास बँकेच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाजी घाटावरील व्यवसायिकांनी आपल्या मालाची आवरा आवर केल्याने त्यांना कमी प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागेल मात्र पुराचे पाणी आणखी वाढल्यास त्यांचं पुन्हा मोठ नुकसान होईल.

तीतूर डोंगरी नदीवरील धरणे भरली आहेत त्याने पुराचे पाणी सातत्याने उग्र रूप धारण करीत असते आज पुन्हा नदीची जळपातळी वाढल्यास शहरात नदीकाठची कुटुंबीय,आणि दुकाने असलेल्या व्यावसायिकाना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज