fbpx

एरंडोल तहसील कार्यालयात ध्वजारोहण

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ । एरंडोल तहसील कार्यालयात भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला तसेच “माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पिकपेरा” या महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महत्त्वाचे प्रकल्प प्रचार-प्रसिद्धी करिता शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत एरंडोल शहर व एरंडोल भागातील सर्व गावांत रिक्षा स्पीकर द्वारे माहिती देण्यात येत आहे.येत्या आठवड्यात पूर्ण मंडळात प्रचार प्रसिद्धी केली जाणार आहे.

यावेळी तहसीलदार सुचिता चव्हाण,नायब तहसीलदार एस.पी.शिरसाट,नायब तहसीलदार आर.एस.जोशी,आर.एन.अहिरे मंडळ अधिकारी,व्ही.आर. मानकुंबरे,शहर तलाठी एरंडोल सलमान तडवी,पुरवठा अधिकारी संदीप नीळे,भाऊसाहेब मनोज शिंपी, नंदनवार भाऊसाहेब, शिवाजी महाजन,ज्ञानेश्वर राजपूत, स्मिता महाजन,योगेश्वरी तोंडे,स्वती भोसले,पूनम सोनवणे, शहर कोतवाल एरंडोल पंकज भोई व तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज