fbpx

जामनेर तालुक्यातील ५००० लाभार्थ्यांना खावटी किटचा लाभ मिळणार – आ.महाजन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२१ । महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खावटी योजने अंतर्गत “खावटी किट वितरण” सोहळा माजी मंत्री आमदार गिरीष महाजन यांच्याहस्ते दि.१८ जुलै रविवार रोजी तालुक्यातील काळखेडा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी जामनेर तालुक्यातील ५००० लाभार्थ्यांना खावटी किटचा लाभ मिळणार असल्यचे आ.महाजन यांनी केले.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिकचे सोनवणे (भाप्रसे) व यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सौ.विनिता सोनवणे, सेवानिवृत्त अभियंता जे.के.चव्हाण, जि.प.सदस्य विलास बापू पाटील, अशोक भोईटे (माजी सभापती), काळखेडे सरपंच सौ छाया शेले, वाघारी सरपंच सौ. माया खोनगरे, आदिवासी पारधी महासंघ बोदवड तालुका अध्यक्ष समाधान साळुंके सहाय्यक प्रकल्प अधिकारी, रोकडे ग्रा.पं. सदस्य काळखेडे आदी. मान्यवर यांचेसह परिसरातील वाघारी, पाटखेडा, काळखेडे, वडगाव टिघ्रे, बेटावद गावातील आदिवासी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.ना. सोनवणे महासचिव आदिवासी पारधी महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt