एकाच इमारतीत पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळल्यास करणार सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यात गृहनिर्माण संस्था किंवा इमारतीत मध्ये पाच पेक्षा जास्त कोविड-19 बाधित रुग्ण असतील, अशा ठिकाणी सुक्ष्म प्रतिबंधित (Micro-Containment Zone) म्हणून घोषित करण्याबाबत महसुल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार निमावली जाहिर करण्यात आली आहे.

त्यानुसार जिल्ह्यात गृहनिर्माण संस्था किंवा इमारतीत मध्ये पाच पेक्षा जास्त कोविड-19 बाधित रुग्ण असतील. अशी ठिकाणे सुक्ष्म प्रतिबंधित (Micro-Containment Zone) म्हणून घोषित करण्याबाबतच्या सुचना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज