माता न तू वैरिणी..पाच दिवसांच्या बालिकेस पोलीस ठाण्याबाहेर सोडून आईचे पलायन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । अवघ्या सहा दिवसांच्या बालिकेस पोलिस ठाण्याबाहेर सोडून आईने पलायन केले. ही मन हेलावणारी घटना गुरुवारी भुसावळात घडली.पोलिसांनी या बालिकेस जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शिशू विभागात ठेवले आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या बाहेर गुरुवारी दुपारी 3 वाजता ही घटना घडली. या पोलीस ठाण्याच्या बाहेर काही भिक्षुकी करणारे लोक बसलेले असतात. दुपारी एका महिलेने या मुलीस त्यातील एका व्यक्तीकडे दिले. काही कळण्याच्या आतच ती महिला तेथून निघून गेली. भिक्षुकी करणाऱ्यांनी तिचा शोध घेतला परंतु मिळून आली नाही. यानंतर त्यांनी बालिकेस पोलीस ठाण्यात नेले. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी पथक पाठवून पुन्हा त्या महिलेचा शोध घेतला.

अखेर सायंकाळी सहा वाजता पोलीस कर्मचारी मीना कोळी, एस. एम. बारी, प्रणय पवार यांनी या बालिकेस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. वैद्यकीय तपासणी केली असता बालिका सुदृढ असल्याचे निष्पन्न झाले.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -