पाच दिवसांच्या मुलाने हरविले पितृछत्र

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । पाच दिवसापूर्वीच पुत्ररत्न प्राप्त झाल्याच्या आनंदात असलेल्या दुचाकीस्वार बापाचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. हरसिंग भिला राठोड (वय ३५, रा. सारवातांडा ता. पारोळा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. एकलग्नजवळ सायंकाळी हा अपघात झाला.

सविस्तर असे की,  जळगावहून तो घरी सारवातांडा येथे जोडीदारासोबत निघाला होता. संध्याकाळी एकलग्न गावाजवळ गुजरातकडील एका ट्रकने मागून त्याला धडक दिली. त्यात दोघे खाली पडले. यात हरसिंग राठोड व त्याचा जोडीदार जखमी झाला होता. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हरसिंग राठोड यांना डॉ. स्वप्नील कळसकर यांनी मृत घोषित केले. हरसिंग राठोड यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, पाच दिवसांचा मुलगा असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -