fbpx

जळगावात सायटोमेगालो विषाणूचा पहिला बळी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२१ । जळगाव जिल्ह्यात सायटोमेगालो व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. अमळनेरच्या ३३ वर्षीय तरुणाला कोरोनानंतर सायटोमेगालो या व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर त्याचा २४ रोजी रात्री मृत्यू झाला. पोस्ट कोरोनात सायटोमेगालो व्हायरसची लागण होऊन दगावलेला बहुधा पहिलाच रुग्ण असावा

गेल्या काही दिवसांपूर्वी त्या तरुणाला कोरोना लागण झाली होती. त्याने कोरोनाचे उपचार अमळनेरमध्येच घेतले. त्यानंतर तो घरी गेला. त्याला पुन्हा ताप आला. त्यानंतर ऑक्सिजनची पातळी खालावली. त्यानंतर त्याला जळगावच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तरीही प्रकृती खालावत असलल्याने तसेच व्हेंटिलेटरची गरज भासत असल्याने त्याला एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर २५ दिवस उपचार करण्यात आले. अखेर सोमवारी रात्री उशिराने त्याची प्राणज्योत मालावली. पोस्ट कोरोनाच्या अडचणींमध्ये सायटोमेगालो व्हायरसने दगावलेला हा बहुधा पहिलाच रुग्ण असावा.

सायटोमेगालो हा नवीन विषाणु नाही. मात्र कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांची रोग प्रतिकारशक्ती खूपच कमी होते. सायटोमेगालो हा विषाणू अनेकदा सदृढ व्यक्तींच्या शरिरात निष्क्रीय अवस्थेत असू शकतो. मात्र रुग्णाची रोगप्रतिकार क्षमता कमी झाली की, तोदेखील ॲक्टिव्ह होतो. यात रुग्णाला अंगावर पुरळ येणे, ताप येणे, ऑक्सिजन पातळी कमी होणे, यासारखी लक्षणे दिसून येतात. तसेच शरिराच्या कोणत्याही भागात इन्फेक्शन होऊ शकते, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी सांगितले.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज