fbpx

पहिल्याच दिवशी २२२ दिव्यांगांची तपासणी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार २८ जुलैपासून ४ महिन्यानंतर कोरोनामुळे थांबलेले दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज अखेर सुरु झाले. दिव्यांग मंडळात पहिल्याच दिवशी सुमारे  २२२ लाभार्थ्यांनी उपस्थिती देऊन प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली. 

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार दि. २८ जुलै २०२१ पासून दिव्यांग मंडळ अद्ययावत सुविधांसह कार्यान्वित झाले आहे. 

दिव्यांग मंडळ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना दर बुधवारी प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु झाली. तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान करण्यात आली. तपासणी मुख्य गेट नं. २  कडील  अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात तसेच ओपीडी कक्षात झाली.  तपासणीसाठी कुठलीही फी आकारली जात नाही.

पहिल्या दिवशी अस्थिव्यंग १०१, नाक-कान – ०९, मानसिक- ४०, बालरोग- ०२, औषधवैद्यकशास्त्र – २७, नेत्ररोग – ४७  असे एकूण २२२ दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगांची तपासणी झाली. यावेळी उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे, मंडळाचे सचिव तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित यांच्यासह तज्ज्ञ डॉ. नेहा भंगाळे, डॉ. योगेश गांगुर्डे, डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. दिलीप महाजन, डॉ. विनोद पवार, डॉ.प्रसन्न पाटील, डॉ. गिरीश राणे यांनी दिव्यांगांची तपासणी केली. कर्मचारी गोपाळ सोळंकी, चेतन निकम, दत्तात्रय पवार, आरती दुसाने, विश्वजीत चौधरी  यांनी सहकार्य केले. 

दिव्यांगत्व  प्रमाणपत्र मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी शासकीय संकेतस्थळ (www.swavlambancard.in) येथे जाऊन (Apply for Disability certificate & UDID card) या लिंकवर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. तेथे प्रमाणपत्र नूतनीकरणची देखील लिंक उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून अर्जासह आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट २ फोटो व जुने दिव्यांग प्रमाणपत्र तथा संबंधित कागदपत्र घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दर बुधवारी लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे. येथील प्रक्रिया झाल्यावर प्रमाणपत्र घरपोच तसेच पुढील आठ दिवसात (www.swavlambancard.in) या संकेतस्थळावरून प्रिंट काढून लाभार्थ्याला मिळू शकणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt