fbpx

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अग्निसुरक्षा प्रतिबंधक प्रशिक्षण

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२१ । रुग्णालयात लागणाऱ्या आगीवर प्रतिबंधक उपाययोजना तातडीने करता याव्या याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी दि २४ जून रोजी अग्निसुरक्षा प्रतिबंधक प्रशिक्षण विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आले. 

प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी, मुंबईचे सहायक संचालक संजय पाटील,  तज्ज्ञ सदस्य विक्रम देसाई हे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आले होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे मंचावर उपस्थित होते. 

यावेळी प्रशिक्षणामध्ये सांगितले की,  आग रोखण्यासाठी मॅन्युअल फायर अलार्म प्रणाली कार्यान्वित ठेवली पाहिजे. त्यासह अग्निशमन दलाला कळवून आपल्या कर्मचारी वर्गाला धीर देऊन योग्य सूचना करीत आग प्रतिबंधक उपकरणांचा वापर केला पाहिजे. वेळोवेळी फायर ऑडिट करून घ्यावे, असेही मार्गदर्शन त्यांनी केले. आग लागल्यावर आणि आग आटोक्यात आणण्यासाठी करायच्या कृतीबाबत संजय पाटील आणि विक्रम देसाई यांनी माहिती दिली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) च्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. हे काम वेगाने व पारदर्शक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

यावेळी उपस्थित सहभागींनी प्रश्नोत्तराद्वारे माहिती जाणून घेतली. यावेळी उपअधिष्ठाता डॉ.अरुण कासोटे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित,  रुग्णालयाच्या अग्नी सुरक्षा प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष डॉ. वैभव सोनार, सदस्य डॉ. श्रीकृष्ण चव्हाण, डॉ. डॅनियल साजी विविध विभागांचे विभाग प्रमुख डॉ. योगिता बावस्कर, डॉ बाळासाहेब सुरोसे,  डॉ. किशोर इंगोले,  डॉ.अंजली वासडीकर, डॉ. प्रसन्न पाटील, डॉ. गणेश लोखंडे, अधिसेविका प्रणिता गायकवाड आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज