fbpx

जळगाव एमआयडीसीतील केमिकलच्या कंपनीला आग

mi-advt

जळगाव  लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । जळगावमधील एमआयडीसी परिसरातील डी सेक्टरमध्ये असलेल्या मनोहरलाल जमनदास यांच्या मालकीच्या लिड्स स्केम या केमिकल कंपनीला आज मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत कंपनीच्या परिसरातील लाकूड व गवत जळून खाक झाले. ही कंपनी अनेक वर्षापासून बंद आहे, त्यामुळे कुठलीही हानी झाली नाही.

कंपनीच्या मागे रामेश्वर कॉलनीचा रहिवासी परिसर आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकूड देखील असल्याने परिसरातील वाढलेल्या गवताला आग लागली. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी प्रकाश चव्हाण, पन्नालाल सोनवणे, नितीन बारी, गंगाधर कोळी यांनी तात्काळ बंब घेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्धातास पाण्याचा मारा केल्यानंतर आग आटोक्यात आणली. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत एमआयडीसी पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज