बचत गटांना ३२ कोटींचे विक्रमी कर्ज वाटपाने महिलांचे आर्थिक सबलीकरण : खा. उन्मेश पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१। केंद्र सरकारच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील दोन हजार बचत गटांना ३२ कोटी रुपयांचे कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. महिला भगिनी सक्षम झाल्या तर देश सक्षम होणार आहे. हा मोठा विचार प्रत्यक्ष कृतीतून साकारला जावा यासाठी बचत गटांना अधिकाअधिक आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने अर्थसहाय्य केले जात आहे. बचत गटांना कर्ज पुरवठा करण्यासाठी बँक स्वतःहून पुढे येत आहे. यामुळे येत्या काळात बचत गटांनी आपले बँकेशी असलेले आर्थिक नाते अधिक मजबुत करीत आपल्यासह आपल्या परिसराला आर्थिक स्वयंपूर्ण करण्यासाठी महिला भगिनिंनी पुढे यावे, असे प्रतिपादन खासदार उन्मेश पाटील यांनी केले.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जळगाव लोकसभा मतदार संघातील महिला बचत गटांना कर्ज वाटप शुभारंभ पातोंडा (ता. चाळीसगाव) येथून करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार उन्मेश पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक अनादी विश्वास उपस्थित होते. यावेळी पातोंडा येथील ११५ बचत गटांना प्रत्येकी दोन लाख रुपये याप्रमाणे अडीच कोटी रुपयांचे कर्ज वाटप प्रमाणपत्र तर खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते बचत गटांना कर्ज पुरवठा मंजुरीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर लीड बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अरुण कुमार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती पोपट भोळे, चाळीसगाव सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक प्रताप खेमनार, पंचायत समिती उपसभापती भाऊसाहेब पाटील, माजी सभापती संजय पाटील, लोकनियुक्त सरपंच रेखा माळी, गटविकास अधिकारी नंदकुमार वाडेकर, विस्तार अधिकारी दिगंबर शिर्के, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन समन्वयक सतीश बिल्हारे, कृषी अधिकारी ऋषिकेश सरगर, उपसरपंच दीपक पाटील, सुरेश महाराज हिंगोणेकर, प्रभाकर पाटील, वाघळी बँक व्यवस्थापक लालचंद मीना, कजगाव बँक व्यवस्थापक सुरेश कुमार, नगरदेवळा बँक व्यवस्थापक श्री. रोकडे, खडकी बँक व्यवस्थापक कपिल भालेराव, ग्रामपंचायत सदस्य दिपक सरदार, नाना सावळकर, वैशाली माळी, सविता सोनवणे, ग्रामसेवक एस.पी. मोरे, माजी सरपंच देविदास माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज