…अखेर कन्नड घाटातील वाहतूक २१ तासांनी सुरळीत

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । कन्नड घाटात रस्ता रुंदीकरणासह संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरु आहे. असे असतांनाही हा घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने बुधवार दि.१० रोजी रात्री १० वाजेपासून घाटात वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल २१ तासांनंतर घाटातील वाहतूक सुरळीत झाली.

गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे कन्नड घाटात दरड कोसळल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दरड हटविल्यानंतर आणि काही दुरुस्तीची कामे केल्यानंतर टप्प्याटप्प्याने हा सुरु करण्यात आला. प्रशासनाकडून नुकताच हा घाटातून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. परंतु, घाटात दोन ठिकाणी संरक्षण भिंत उभारणीचे व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे बुधवार दि.१२ रोजी रात्री १० वाजेपासून घाटात वाहतूक कोंडी झाली होती. गुरूवारी रात्री ७ वाजता काही प्रमाणात ही वाहतुक काेंडी दूर होऊन धिम्यागतीने वाहतूक सुरळीत झाली होती. वाहनधारकांच्या बेशिस्तपणामुळे तब्बल २१ तास कन्नड घाट जाम हाेता.

कारवाईचा इशारा
कन्नड घाटातील यू टर्नपासून ते खालपर्यंत डांबरीकरणाचे काम केले जात आहे. म्हसोबा मंदिरापासून ते चाळीसगावच्या दिशेने दोन ठिकाणी रस्ता खचला होता, त्याठिकाणी संरक्षण भिंत उभारली जात असून रस्ता रुंद केला जात आहे. त्यामुळे घाटात चार ठिकाणी एकेरी वाहतुक सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. पुढे जाण्याच्या प्रयत्नात कार, दुचाकी चालक आपली वाहने बेशिस्तपणे चालवून माेठ्या वाहनांना आडवी येतात, त्यामुळे सर्व वाहनधारकांनी घाटातून जातांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा महामार्ग पाेलिसांनी दिला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज