fbpx

अखेर पाेल शिफ्टिंगच्या कामाला झाली सुरुवात

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । दीड वर्षापासून उड्डाण पुलाला अडथळा ठरणाऱ्या पाेल शिफ्टिंगच्या कामाला बुधवारपासूअखेर सुरुवात झाली. डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात ट्रान्स्फाॅर्मर उभारणीच्या कामापासून मक्तेदाराने शुभारंभ केला.आगामी एक महिन्यात काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या कामात विद्युत पाेलचा अडथळा आल्यामुळे पुलाचे काम लांबणीवर पडल्याचा अाराेप गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे पाेल शिफ्टिंगचे काम तातडीने सुरू व्हावे, यासाठी सर्वच पातळीवर दबावतंत्राचा वापर सुरू झाला हाेता. यात निधीची अडचण अली. निधी मिळाला तर मंजुरीचा प्रश्न निर्माण झाला. या संपूर्ण घडामाेडीत सुमारे दीड वर्ष लाेटल्यानंतर अखेर महावितरण कंपनीने मक्तेदारामार्फत कामाला सुरुवात केली आहे. उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या मक्तेदाराच्या मागणीनुसार टाॅवर ते जिल्हा परिषद चाैकादरम्यानचा विद्युत पाेलचा अडथळा दूर करण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्या दृष्टीने बुधवारी मक्तेदाराच्या माध्यमातून कामाला सुरुवात देखील झाली आहे. त्यामुळे माेठा प्रश्न मार्गी लागणार आहे.

mi advt

पाेल शिफ्टिंगचे काम दाेन टप्प्यात केले जाणार आहे. यात शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या दाेन्ही बाजूच्या कामांचा यात अंतर्भाव अाहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेसमाेरील कामाला प्राधान्य दिले जात आहे. यात ट्रान्स्फाॅर्मर उभारणी, अंडररग्राऊंड केबल टाकणे, फीडर पिलर उभारून वीज ग्राहकांच्या मीटरपर्यंत कनेक्शन पाेहाेचवणे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर जुनी लाइन बंद करून दाेन ते तीन तासांत नवीन लाइनवरून विद्युतपुरवठा सुरू हाेईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, हे संपूर्ण काम करण्यासाठी मक्तेदाराला १५ दिवसांत काही कालावधीसाठी विद्युतपुरवठा बंद करावा लागणार आहे.

कंपनीने मक्तेदारामार्फत कामाला सुरुवात केली आहे. उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या मक्तेदाराच्या मागणीनुसार टाॅवर ते जिल्हा परिषद चाैकादरम्यानचा विद्युत पाेलचा अडथळा दूर करण्याचे काम सर्वात आधी पूर्ण केले जाणार आहे. त्या दृष्टीने बुधवारी मक्तेदाराच्या माध्यमातून कामाला सुरुवात देखील झाली अाहेे. त्यामुळे माेठा प्रश्न मार्गी लागणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज