अखेर रावेरातील अवैध दारू विक्रीवर शिक्कामोर्तब ; चार ठिकाणी कारवाई

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । रावेर तालुक्यातील अधिकार्‍यांनी जेवणाच्या चार ढाब्यांची तपासणी करीत कारवाई केल्याने अनधिकृतरीत्या दारू विक्री करणार्‍यांच्या गटात मोठी खळबळ उडाली.या विभागाचे दुय्यम निरीक्षक टेंगळे यांनी बर्‍हानपूर-अंकलेश्वर महामार्गावील ढाब्यांची तपासणी १४ रोजी केली.यात चार ढाब्यांवर अवैध दारू विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने कारवाई करण्यात आली असता.देशी-विदेशी दारूसह बियर मिळून ९००० हजार १२०  रुपयांचे मद्य जप्त करण्यात आल्याचे दुय्यम निरीक्षक टेंगळे म्हणाले.

सविस्तर असे की, बनावट दारूकडे दुर्लक्ष झाल्याने कर्तव्यात कसूरचा ठपका ठेवत यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चार जणांना जुलै महिन्यात निलंबित केले होते.त्यानंतर किमान कारवाई होईल अशी,अपेक्षा असताना परीस्थिती जैसे-थे निर्माण झाली.रावेर तालुक्यात जेवणाच्या ढाब्यावर अवैधरीत्या दारू विक्री होत असून निरीक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त समाजमाध्यमात प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेऊन मंगळवारी रात्री महामार्गाला लागून असलेल्या ढाब्यावर कारवाई करण्यात आली.

अवैध दारू प्रकरणी चार ढाब्यांवर कारवाई

यावल-बर्‍हाणपूर महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवार, १४ रोजी रात्री कारवाई करण्यात आली. यामध्ये चार ढाब्यावर कारवाई करण्यात आली. यात देशी-विदेशी दारूसह बियर मिळून ९००० हजार १२० रुपयांचे मद्य जप्त करण्यात आल्याचे दुय्यम निरीक्षक टेंगळे म्हणाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -