चाळीसगाव शहरातील खड्डे तात्काळ बुजवा, अन्यथा…! रयत सेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२१ । चाळीसगाव शहरातील पूर्ण प्रभागाच्या रस्त्यांची चाळण झाली असताना अंडरग्राउंड गटारीचे कारण दाखवून नगरपरीषद खराब झालेल्या रस्त्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. या खराब रस्त्यामुळे अनेकांना मणक्याचे व श्वासाचे आजार झाले आहेत. सर्वच प्रभागातील रस्त्यांवर मुरुम टाकवा तसेच चाळीसगाव शहराचा मुख्य रस्ता असलेला स्टेशन रोड वर छत्रपती शिवाजी चौक ते हॉटेल दयानंद पर्यंत नवीन बांधणी करावी किंवा मोठ मोठी खड्डे पडले आहे.त्या खड्ड्यांमध्ये खडी डाबर टाकून तात्काळ नगरपरिषदेने न बुजविल्यास रयत सेना व मेरा गाव मेरा देश च्या वतीने स्टेशन रोड वर वृक्ष रोपण करून चाळीसगाव नगर परीषदेचा प्रतिकात्मक फोटो लावून आरती आंदोलन करणार असल्याचा इशारा नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना दि २३ रोजी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

सध्या पावसाळा असल्यामुळे खड्ड्यात पाणी साचते त्यामुळे वाहन धारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यातून छोटे मोठे अपघात होत आहेत. त्यातून वाहन धारकांना वाहने चालविणे कठीण झाले आहे. खड्ड्यातील रोड वर पाणी साचल्यामुळे दुचाकी चालकांना त्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही.

त्यामुळे त्या खड्ड्यात दुचाकी चालक वृद्ध व महिला पडत असून त्यांच्या जीवाचे कमी अधिक झाल्यास त्यास सपूर्णपणे चाळीसगाव नगर परीषद जबाबदार राहणार आहे. छत्रपती शिवाजी चौक ते हॉटेल दयानंद पर्यंत स्टेशन रोड ची नवीन बांधणी करावी किंवा रस्त्यावर पडलेले मोठ मोठी खड्डे खडी व डाबर टाकून आठ दिवसात बुजविण्याचे नगर परीषदेचे कर्तव्यच आहे. शहरातील नागरिकांना रस्त्याचा मुलभूत अधिकारा पासून वंचित ठेवल्यास स्टेशन रोड वर पडलेल्या खंड्डयांमध्ये रयत सेना व मेरा गाव मेरा देश च्या वतीने वृक्ष रोपण करून चाळीसगाव नगर परीषदेचा प्रतिकात्मक फोटो लावून आरती आंदोलन करणार आहे.

आंदोलन प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास चाळीसगाव नगरपरीषद नगराध्यक्षा,मुख्याधिकारी व न. पा प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशारा नगर परीषदेच्या उपमुख्याधिकारी श्रीमती फडतरे यांना दि २३ रोजी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदणाची प्रत शहर पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांना पाठविण्यात आली आहे.

निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, शहराध्यक्ष योगेश पाटील ,शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चव्हाण, शहराध्यक्ष सचिन नागमोती, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, तालुका उपाध्यक्ष विलास मराठे, प्रशांत अजबे, छोटू अहिरे तसेच मेरा गाव मेरा देश चे विजय शर्मा, खुशाल पाटील यांच्या सह्या आहेत

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -