विना परवाना सूर्यफूल‎ बियाण्यांची विक्री भोवली, गुन्हा दाखल‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । विना परवाना सूर्यफूल‎ बियाण्यांची विक्री करणे चांगलीच भोवली आहे. जळगाव‎ महाराष्ट्रात विक्रीस परवाना‎ नसलेल्या सूर्यफुलाच्या‎ बियाण्यांच्या ६७ हजार रुपये‎ किमतीच्या १७ बॅग गुणवत्ता‎ नियंत्रण पथकाने पारोळा येथील‎ कृषी केंद्रातून जप्त केल्या आहे.‎

महाराष्ट्रात विक्रीचा परवाना‎ नसलेले सूर्यफूल बियाणे विक्री‎ करणाऱ्या जय सेवालाल अॅग्रेा‎ कजगाव नाका, पारोळा येथे‎ जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक‎ अरुण तायडे व पारोळा पंचायत‎ समिती कृषी अधिकारी यांनी‎ सापळा रचून ६७ हजार ९८० रुपये‎ किंमतीचे १७ सू्र्यफूल‎ बियाण्याच्या बॅग जप्त केल्या‎ ‎ आहे.

याप्रकरणी जय सेवालाल‎ अॅग्रोचे रितेश कैलास पवार (रा.‎ पारोळा) व अॅग्री बी. सन फार्म‎ प्लस हायब्रीट राजकोट गुजरात‎ यांच्याविरुध्द सरकारतर्फे बियाणे‎ अधिनियम १९६८ नुसार पारोळा‎ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे.‎ अनधिकृतरीत्या विनापरवाना‎ सूर्यफूल बियाणे विना बिलाने‎ शेतकऱ्यांनी खरेदी करु नये. अशा‎ विना परवाना सूर्यफूल बियाण्याची‎ अनधिकृतपणे विक्री करत‎ असल्याचे दिसून आल्यास कृषी‎ विभागाला कळवावे, असे‎ आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी‎ अधिकारी संभाजी ठाकूर यांनी‎ केले आहे.‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -